Book Publishing

#ladakhKushakBakula #ArunKumar #DrMohanBhagwat #BookPublish

          लद्दाखपुत्र कुशोक बकुला यांची जीवनगाथा उद्बोधक आणि पथदर्शक “ लद्दाखपुत्र कुशोक बकुला लामा असूनही एकट्याने तेथील तरुणांना जागृत आणि एकत्रित करून देशविरोधी कारवायांचा प्रतिकार करण्याचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणारे उद्बोधक आणि प्रेरक व्यक्तिमत्व आहे .” — असे उद्बगार प.पू.सरसंघचालक डाँ. मोहनजी भागवत यांनी काढले. “ धारा 370 आणि 35 A हटविल्याने आतंकवाद विरोधातील अडथळे दूर झाल्याने भय संपले असले तरी संकट संपले नाही “, असेही ते पुढे म्हणाले . लद्दाख जम्मू कश्मीर अध्ययन केन्द्राच्या वतीने दि. 16 ऑक्टोबर रोजी चिटणवीस सेंटर नागपूर येथे संपन्न झालेल्या पुस्तकद्वय प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते . कार्यक्रमस्थळी संस्थेच्या अध्यक्षा मीराताई खडक्कार , वं. शान्ताक्का , श्री. राजेशजी लोया ,अँड. आनंद परचुरे , माजी सैनिक अधिकारी , विविध विद्याशाखांचे अधिकारी इ. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . संस्थेचे सचिव श्री. अभिनन्दनजी पळसापुरे यांनी पी.पी. टी. माध्यमातून संस्थेच्या कार्याचे स्वरूप उलगडून दाखविले. कोषाध्यक्ष श्री. सागरजी मिटकरी यांनी आभार व्यक्त केले. डाँ. प्रगती वाघमारे यांनी संस्कृतप्रचुर हिन्दीतून सूत्रसंचालन केले. बहुसंख्य बुद्धिजीवींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. जयतु भारतम् I

for any details

 Abhinandan Palsapure, Secretary

Mob : 7709711222

Event Gallery